logo

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा 'डे आऊट'! सहा ठिकाणी घरफोडी, पोलिसांकडून तपासाला अपयश Pune News: पुण्यात दिवसात सहा ठिका

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा 'डे आऊट'! सहा ठिकाणी घरफोडी, पोलिसांकडून तपासाला अपयश
Pune News: पुण्यात दिवसात सहा ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी बंद घरे आणि बांधकाम साईटला लक्ष्य केले. सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. धायरी, मार्केट यार्ड, नाना पेठ, फुरसुंगी, लोहगाव आणि चंदननगरमध्ये घटना घडल्या. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.पुणे : शहरात घरफोड्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, एका दिवसात सहा ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. चोरट्यांनी बंद घरे, बांधकाम साइट; तसेच रात्रीच्या वेळेला झोपलेल्या नागरिकांचे घर लक्ष्य करून सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या सर्व घटना २५ ते २६ जून दरम्यान घडलेल्या असून, कोणत्याही प्रकरणात अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.धायरीत चोरी
धायरी येथील सचिन पोकळे घरात झोपले असताना दरवाजाजवळील पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्या नंतर दोन मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

0
0 views