
Pune Crime : दिव्य शक्तीच्या नावाखाली अश्लील कृत्य करण्यास भाग पाडलं, बिल्डरची तक्रार, पुण्यात भोंदूबाबावर गुन्हा
Pune
Pune Crime : दिव्य शक्तीच्या नावाखाली अश्लील कृत्य करण्यास भाग पाडलं, बिल्डरची तक्रार, पुण्यात भोंदूबाबावर गुन्हा
Pune Bhondu Baba arrest : आरोपी प्रसाद तामदार याने स्वतःला "बाबा" म्हणून सादर करत, फिर्यादीचा विश्वास संपादन केला. "माझ्याकडे दिव्य शक्ती आहे. मी तुझ्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो." असे सांगितलेस्वयंघोषित "दिव्य शक्ती" असलेल्या भोंदूबाबाच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलिसांनी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. सुस परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली. स्वतःला "दिव्य शक्तीची आत्मभूती" प्राप्त असल्याचे सांगून आरोपीने पीडिताच्या मोबाईलमध्ये लपून अॅप इन्स्टॉल केले. त्यानंतर मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच वेश्यागमनास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.या प्रकरणी प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद भिमराव तामदार, वय 29 वर्ष, रा. स्वामी समर्थ बिल्डिंग, सुस गाव, मुळशी, पुणे, याच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात फसवणूक, मानसिक छळ आणि अॅपद्वारे गोपनीय माहितीचा गैरवापर अशा गंभीर कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी स्वप्नील शंकर पारखे, वय 39 वर्ष, रा. न्यू इंद्रप्रभा सोसायटी, देहूरोड, पुणे, हे बांधकाम व्यवसायिक आहेत. नोव्हेंबर 2024 ते 26 जून 2025 या कालावधीत त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.