logo

गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा, एकाला घेतले ताब्यात रामानंदनगर पोलिसांची कारवाई, १९ सिलिंडर जप्त....







व्यावसायिक वापरा घरगुतीस सिलिडरस्या : बेकायदेशीररित्या घरात साठा करून ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (२८, रा. वीर सावरकर नगर, पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेत १९, गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई २७ जून रोजी वीर सावरकर नगरात करण्यात आली. या प्रकरणी शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा परिसरातील वखारीजवळ एका व्यक्तीच्या घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या साठा केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोउनि सचिन रणशेवरे, पोहेकों जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सूर्यवंशी, अजय सपकाळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले.

पुरवठ्याची माहिती नाही

गॅस सिलिंडर कुठून घेतले याविषयी पोलिसांनी शाह याच्याकडे विचारणा केली, मात्र त्याने कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही.

५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

याप्रकरणी पोलिस नाईक घिनोद सूर्यवंशी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी छाप्यात शाह याच्या घरातून आठ भरलेले व ११ रिकामे असे एकूण १९ गॅस सिलिंडर, दोन वजनकाटे व एक रेग्युलेटर असा एकूण ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पथकाने पिंप्राळा परिसरातील वखारीजवळील वीर सावरकर नगरातील एका घरात छापा टाकला असता तेथे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरसह वजन काटा आढळून आला. हे साहित्य जप्त करण्यासह वसीम शाह याला ताब्यात घेतले.

3
401 views