logo

पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम



आज यवतमाळ विश्रामगृह येथे स्वीकारणार नागरिकांच्या शुभेच्छा

यवतमाळ – शिवसेनेचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार, ३० जून रोजी शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्रस, दारव्हा, नेरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी हे सामाजिक कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय राठोड हे सोमवारी वाढदिवसानिमित्त विश्रामगृह यवतमाळ येथे नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ते विश्रामगृह येथे नागरिकांना भेटणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी येणारे शिवसैनिक, हितचिंतक यांनी विश्रामगृह येथेच यावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

14
375 views