logo

अकोला महानगरपालिका गुंठेवारी नियमित करणार – मनपा आयुक्तांचा आश्वासन

शकील खान/अकोला:- AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अकोला शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, दिनांक ३१ मार्च २०२५ नंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्या वेळी रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यामुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणीत होते आणि त्यांना लेआउट करून घेणे शक्य झाले नाही.
या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका आयुक्तांनी आश्वासन दिले की लेआउटची प्रक्रिया लवकरच पुन्हा सुरू केली जाईल, आणि ही प्रक्रिया प्रारंभी केवळ १० दिवसांसाठी सुरू ठेवली जाईल. ज्यांच्या प्लॉट्सचे किंवा घरांचे लेआउट झालेले नाही, त्यांनी या कालावधीत आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

100
4057 views