logo

कृषी क्रांतिचे अग्रदूत माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अर्जुना येथे शेतकऱ्यांना कीटकनाशकाचे वाटप


डॉ.नीरज वाघमारे यांचा पुढाकार

यवतमाळ,दि.१ जुलै —कृषी क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांच्या संकल्पनेतून,तसेच शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड सचिन मनवर,कृष्णा पुसनाके व प्रा.पंढरी पाठे यांच्या माध्यमातून अर्जुना (ता.यवतमाळ) येथील १० शेतकऱ्यांना प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफॉस) कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले.
या पहिल्या टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तुकाराम डोकडे,राजेंद्र श्रीवास,अमोल चरमोले,किसनराव पारधी,उदयभान उरकुडे,सुधाकर उरकुडे,नामदेव डोकडे,गुलाब सलाम,कैलास सुरोशे व प्रणित सुरोशे यांचा समावेश होता.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची गरज व योग्य माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

29
120 views