logo

गांजा प्रकरणातील आरोपी गजाआड

गंगाखेडः महिनाभरापूर्वी तालुक्यातील डोंगरपिंपळा परिसरात ९ किलो गांजा गंगाखेड पोलिसांनी पकडला होता. या प्रकरणातील फरार आरोपी दत्तराव सीताराम केजगीर (रा. डोंगरपिंपळा) यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी अटक करून गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी गंगाखेड पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डोंगरपिंपळा येथील दत्तराव केजगीर हा एक प्रकरणात फरार होता. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि. राजू मुत्येपोड, सपोउपनि. सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, परसराम गायकवाड, शरद सावंत यांच्या पथकाने डोंगरपिंपळा शिवारात अटक केली.

दरम्यान, मंगळवारी ठाणे प्रभारी सपोनि. आदित्य लोणीकर यांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी दत्तराव केजगीर यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांना इतर बाबींचा तपास करता येणार आहे

14
383 views