हसणाबादेत वृक्षदिंडी "दुमदुमला श्री हरी नामाचा गजर"
हसनाबाद येथील श्री गणपती इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थी ध्वज पताकासह वारकरी वेशात उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हातात झाडांची रोपटी होती तर त्यांच्या मुखात "वृक्षवल्लीं आम्हा सोयरी वनचरी" हा अभंग होता. विद्यार्थिनी राखूमाई बनून डोक्यावर तुलसी घेऊन "जय जय विठ्ठल" नामाचा गजर करीत होत्या. गावातील या वारीत ग्रामस्थही आनंदाने सहभागी झाले होते.अनेक ग्रामस्थ या वृक्ष घेतलेल्या वारीचे फोटो व्हिडिओ काढण्यात तल्लीन झाले होते. काही वारी सोबत हरिनामाचा गजर करण्यात मग्न झाले होते. वारीत रिंगण,फुगडी,झिम्मा,पावली इत्यादी पारंपरिक धार्मिक क्रिडा प्रकार केले जात होते. विद्यार्थी कुतूहलाने त्याकडे पहात सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत होते. पूजन व रिंगण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांच्या हाताने शाळेत वृक्षावरोपण करण्यात आले.
यात शाळेच्या मुख्याध्यापिका व कर्मचारी यांनी गावाला पंढरीचे स्वरुप देण्यात मोलाची भूमिका बजावली.सर्वानी आनंदाने या उपक्रमाचे कौतुक केले.