logo

चिमुकल्या वारी निघाली पंढरपूरला....

चिमुकल्याची पावले चालती पंढरीची वाट नांदेड -सागवी नांदेड येथील क्युरिओसिटी व उज्वल अकॅडमी संयुक्तविद्यमानाने आषाढी एकादशी निमित्त आषाढी महोत्सव 2025आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून वारकरी दिंडी शाळेपासून विठ्ठल रूक्मिणी मंदिरापर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण परिसर विठ्ठलाच्या नामघोषने दुमदूमून निघाला. या वारकरी दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी पावल्या खेळून तसेच फुगडी वारकरी वेशभूषा सादरीकरण अशा विविध भक्ती मय कलागुणांनी आषाढी एकादशी निमित्त पावसाच्या ओल्याचिंब वातावरणात हर्ष उल्हास आणि विठ्ठलाचे नामस्मरण करीत उपस्थित सांगवी परिसरातील सर्व पालकांना महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व हे संस्कार विद्यार्थ्यांनी जोपासले पाहीजे असे भक्ती मय वातावरण निर्माण केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन शाळेचे संचालक प्रा.माधव खिल्लारे सौ. आशा माधव खिल्लारे व तसेच पालक प्रतिनिधी पत्रकार तथा संपादक धनाजी सुर्यवंशी क्युरिओसिटी प्री .प्रायमरीच्या प्राचार्या अनुराधा काळे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी प्रा.माधव खिल्लारे यांनी संपूर्ण उपस्थित विद्यार्थी व शिक्षक व पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन हा आषाढी महोत्सव संपन्न करावा व महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या क्युरिओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमीमध्ये आपल्या पाल्याचा जास्तीत जास्त संख्येने प्रवेश करून उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी असा शुभ संदेश दिला.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. धनाजी सुर्यवंशी यांनी क्युरीओसिटी स्कूल ही सांगवी ही परिसरातील अतिशय गुणवंतापूर्ण शिक्षणाने नावारूपास येत असून आषाढी एकादशी निमित्त ज्या पद्धतीने चिमुकल्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे त्याबद्दल सर्वांचे मनस्वी अभिनंदन करून ही शाळा सांगवी परिसरातील पालकांसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे नमूद केले यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल संचालक प्रा.माधव खिल्लारे यांनी शाळेचे शिक्षक ; कर्मचारी व परिसरातील सर्व पालकांचे मनस्वी अभिनंदन व आभार व्यक्त केले.याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा मिस गच्चे मिस अंजली मिस व चवणे यांनी मावशी परिश्रम घेतले

35
611 views