माळेगावच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार, तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे !
माळेगांव : राज्यात चर्चा झालेल्या माळेगांव सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली असून कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळेगाव कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चेअरमन म्हणून काम पाहणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष गेली दोन महिने माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलने तब्बल २१ पैकीं २० जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. या वेळी आजी- माजी विद्यमान संचालक मंडळ उपस्थित होते. कारखान्याचे मावळते अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, बाळासाहेब तावरे, जेष्ठ नेते चंद्रराव तावरे हे देखील यावेळी उपस्थित होते.