logo

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारानी निर्माण केला सिनेमा

पीपल्स मुव्हीज प्रीजेंट
चल हल्ला बोल या लोकांच्या वर्गणीतून तयार झालेला सिनेमा नंतर दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी झेप हा लघुपट बनविला आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला. या लघुपट साठी देशातील सर्वात मोठी बृहन्मुंबई महानगरपालिका याचे सफाई कामगार यांनी वर्गणीतून हा सिनेमा बनविलेला आहे.
एका कामगार पदावर रुजू होऊन अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करून उपमुख्य पर्यवेक्षक ( DY. H.S ) या पदापर्यंत झेप घेणाऱ्या विजय तळेकर यांच्या जीवनावर हा लघुपट बनविला . हा लगुपट बघून इतर सफाई कामगार सुद्धा असेच उच्च अधिकारी होतील या प्रेरणेने प्रेरित होऊन शिक्षण घेतील .
हा उद्देश समोर ठेऊन या लघुपट बनविण्यात आला.
या लघुपटाची पट कथा , संवाद , गीत लोकांचा सिनेमाच्या चळवळीतील कार्यकर्ते आणि सफाई कामगार विलास कोंडगेकर यांनी लिहिली आहेत.
या चित्रपटाला कॅमेरा मॅन विनीत कोंडगेकर , प्रणय जाधव आहेत. कलावंत मध्ये भूमिका कोंडगेकर, सिद्धी शिंदे, सुखदा खंडारे , सार्थक खंडारे, अतिश कांबळे , रुशांक कांबळे, विहंग अढागळे , जय रोकडे, हार्दिक तांदळे, गौरव शिंदे, वंश तांदळे, ध्रुव फणसे, चैतन्य , अनिरुद्ध सोनवणे, तसेच इतर बाल कलाकार यांनी अगदी स्वतःचा वेळ देऊन काम केले , जनार्दन यादव ( नापणेकर) सफाई कामगार , तसेच इतर छोटे भूमिका असणारे या सर्वांनी अगदी कोणतेही फी न घेता काम केले, भाजी मार्केट , मटण शॉप, चहा वाला या सर्वांनी अगदी मोफत सीन दिलेच पण त्या वस्तू सुद्धा दिल्या .
अशा प्रकारे लोकांच्या मदतीतून लोकांचा सिनेमा उभा राहिला झेप
महेश बनसोडे दिग्दर्शक यांचा चल हल्ला बोल नंतर चा हा प्रयोग झेप पुन्हा यशस्वी झाला.

18
254 views