
शासकीय कामात अडथळा! शेत रस्ता मोकळा करतांना मज्जाव करणाऱ्या ११ जणांवर कारवाई!!
मन्सूर शहा धोत्राभणगोजी : चिखली
तालुक्यातील धोत्राभणगोजी येथे महसूल विभागाचे कर्मचारी सोमवार ७ जुलै रोजी रस्ता खुला करण्यासाठी गेले होते. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मज्जाव केल्याप्रकरणी ११ जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अमडापूर पोस्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला.
मंडळ अधिकारी ए.टी. शेळके पेठ ता. चिखली यांनी अमडापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी हे वादातील रस्ता खुला करण्यासाठी ७ जुलै रोजी धोत्राभणगोजी येथे गेले होते. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी तुळशीदास नामदेव हळदे यांनी हातात दोरी घेवून आत्महत्या करण्याचा.
इशारा देवून महिलांनी सुध्दा जेसीबी मशीन समोर वादाचा रस्ता खुला करण्यास मज्जाव केला. अशा फिर्यादीवरुन अमडापूर पोलिसांनी नामदेव काशिबा हळदे, शशिकला नामदेव हळदे, तुळशिदास नामदेव हळदे, शिवदास नामदेव हळदे, गोकुळदास नामदेव हळदे, पदमिना तुळशिदास हळदे, सविता शिवदास हळदे, यशोदा गोकुळदास हळदे, गौरव गोकुळदास हळदे, शुभम शिवदास हळदे सर्व रा. धोत्राभणगोजी, संध्या राजेंद्र नरवाडे रा. शेलोडी यांच्यावर अमडापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३२, २२६, १८९ (२), १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ. लक्ष्मण टेकाळे हे करीत आहे.