logo

अथर्व आणि अर्णव या भावांचे जिल्हास्तरावरील सुयश! शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत दोघांचे घवघवीत यश


मुल (जि. चंद्रपूर) –
2024-2025 या वर्षातील शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत बालविकास प्राथमिक शाळा, मुल येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अर्णव लक्ष्मण खोब्रागडे याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून जिल्ह्यात प्रथम मेरिट मिळवले असून, त्याचा मोठा भाऊ अथर्व लक्ष्मण खोब्रागडे याने माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात 29 वा मेरिट मिळवून यशाचा ठसा उमटवला आहे.

ही दोन्ही भावंडे मराठी माध्यमातून शिक्षण घेत असून त्यांचे हे यश शाळेच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. त्यांच्या यशामागे मुख्याध्यापिका सौ. सुनीता बुटे यांचे कुशल नेतृत्व तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. सचिन बल्लावार, श्री. संतोष सोनवाणे, श्री. ललित लांजेवार, श्री. ज्ञानेश्वर नन्नावरे, सौ. कविता खोब्रागडे, सौ. शिल्पा कापसे आणि श्री. विवेक हरमवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

दोघांच्याही यशामुळे शाळेचे, पालकांचे आणि संपूर्ण परिसराचे नाव उज्वल झाले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

12
7689 views