logo

क्युरिओसिटी स्कूलमध्ये चिमुकल्यांनी केली ' गुरूपौर्णिमा 'उत्साहात साजरी

नांदेड दि.10. सांगवी नांदेड येथील क्युरिओसिटी स्कूलमध्ये आषाढी पौर्णिमा अर्थात गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व चिमूकल्यानी शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या महापुरूषांच्या वेशभूषेत येऊन वेगवेगळ्या महापुरूषाचे ब्रीदवाक्य सांगून स्व-परिचयकरून दिला. सर्व प्रथम क्युरिओसिटीचे संचालक प्रा.माधव खिल्लारे व सौ आशा खिल्लारे यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थी;शिक्षक व पालक यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगताना प्रा.माधव खिल्लारे म्हणाले की; प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरू असते कारण प्रत्येकाकडून आपल्याला काही तरी शिकायला मिळतं असते.वतसेच क्युरिओसिटी स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा काळे यांनी सुध्दा गुरूपौर्णिमा हा सण शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका सौ.अशा खिल्लारे म्हणाल्या की आपला सर्वात पहिला गुरू म्हणजे आई कारण ती आपल्याला सर्वात पहिले चालायला ; बोलायला शिकवते व तिथूनच आपल्या शिकण्यास सुरुवात होते असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाची सांगता प्रत्येक विद्यार्थ्यास गुरुच्या पादूका म्हणून पादूकाचे पुजन करून गुरूचे महत्व क्यूरिओसिटीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याच्या कार्यक्रमाने करण्यात आले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षिका नेहा मिस , अंजली मिस ,गच्चे मिस व चवणे मावशी यांनी परिश्रम घेतले

32
924 views