
बाल वारकऱ्यांनी सजवली विठ्ठल नामाची दिंडी
*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा केवड व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केवड येथे बाल वारकऱ्यांनी सजवली विठ्ठल नामाची दिंडी*
आज केवड आश्रमशाळा येथे आषाढी एकादशी निमित्त जवळपास 400 विद्यार्थीसह भव्य बाल दिंडीचे आयोजन प्रशालेच्या वतीने करण्यात आले होते या बाल दिंडीत आषाढी एकादशी वारी निमित्त बाल वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मुक्ताई यांच्या आकर्षक आणि हुबेहूब वेशभूषा केल्याचे दिसून आले या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी पायजमा बंडी धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या हातात भगवे ध्वज टाळ मृदंगाचा निनाद त्याला विणाची साथ ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा रुक्मिणीचा जयघोष करीत आश्रम शाळा परिसरात निघालेल्या दिंडीचे गावकऱ्यांनी लक्ष वेधले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचारी नेहरू पायजमा पांढरी टोपी गळ्यात टाळ व महिलांनी इलकल साडी परिधान केलेली होती विठ्ठल नामाचा जयघोष टाळ मृदंग गोल रिंगण व वारीची अनुभूती ही पहावयास मिळाली ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोशात आश्रम शाळेचा परिसर हा दुमदुमला होता
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यावेळेस केवड आश्रम शाळेत जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा करतात तसेच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जोडलेली आहे खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीचे परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली त्यामध्ये सर्वजण सहभाग घेतात ही गोष्ट लक्षात घेऊन आज शाळेमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते टाळ मृदंगाच्या मीना दात न्यानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखी सह परिसरातून फेरी काढत यातून भक्तीचा संदेश दिला चिमुकल्या वारकऱ्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी हे दिसून आली शाळेच्या प्रांगणात दिंडी आल्यानंतर ज्याप्रमाणे आश्वाचे गोल रिंगण केले जाते असे गोल रिंगण हे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आयोजित केले होते या गोल रिंगण सोहळ्यात बाल वारकऱ्यांसमवेत शाळेतील शिक्षक शिक्षिका व पालकही धावले तसेच महिलांनी फुगडीचे पेर धरत जसे पंढरपुरात दिंडीत वारकरी खेळ खेळतात असे खेळ हे खेळले बाल वारकरी व मोठे वारकरी पथका घेऊन नृत्य करत होते या बाल वारकऱ्यांच्या या भक्तीरसात अवघा आश्रम शाळा परिसर हा भक्तिमय झाला होता
आज या बाल दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखीचे पूजन प्रशालेच्या आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालीदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते