logo

नागपूर जिल्ह्यातल्या देवलापार -पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या कहर थांबता थांबत नाही.

पवनी:नागपूर जिल्ह्यातल्या देवलापार -पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या कहर थांबता थांबत नाही आहे. मानव व पाळीव पशुवर वाघ सतत भीषण हल्ले करित आहे. आज 13 जुलैला दुपारी चारच्या सुमारास नेमटोला गावात राहणारा सुदाम रामदास भलावी वय 28 वर्ष हा देवलापर जवळच्या कामठी हद्दीत शेळ्या चारत असताना वाघाने भयंकर हल्ला करून त्याला गंभीर जखमी गंभीर जखमी केले. देवलापर येथे प्रथमोपचार नंतर त्याला नागपुरात रेफर करण्यात आल्याची माहिती आहे वृत्त लिहितेस तोवर संबंधित वन विभागाकडून घटनेची संपूर्ण माहिती मिळायची होती.

196
7669 views