logo

आडगाव बाजार ग्राम पंचायत कार्यालय मार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम.

आडगाव बाजार: राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
त्याच धर्तीवर आडगाव बाजार ग्राम पंचायत कार्यालय यांनी हा वृक्ष लागवड हा कार्यक्रम राबविला.ग्राम पंचायत कार्यालय आडगाव बाजार येथे सार्वजनिक वृक्ष लागवड करण्यात आली, या वेळी सरपंच सौ.वंदनाताई प्रदीपराव दाभाडे, उपसरपंच विलास राठोड, गट विस्तार अधिकारी ईडोळे साहेब, ग्राम विकास अधिकारी मोरे साहेब, ग्राम पंचायत सदस्य,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, मेडिकल ऑफिसर,मोळके साहेब, सिव्हील स्टॉप. व्हेटरनरी कर्मचारी,ग्राम पंचायत कर्मचारी इत्यादींनी सहभाग घेऊन शेकडो वृक्षांचे वृक्षारोपण केले.

0
0 views