logo

फडणवीसांच्या वाढदिवसाला काँग्रेसचा, चॉकलेट व लॉलीपॉप वाटून उपरोधीक आंदोलन

फडणवीसांच्या वाढदिवसाला काँग्रेसचा ‘लॉलीपॉप’ टोमणा!

गडचिरोली;-मुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेसने ‘लॉलीपॉप-चॉकलेट’ वाटप आंदोलन करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. चॉकलेट-लॉलीपॉपयुक्त केक कापून नागरिकांना वाटप करत काँग्रेसने फडणवीसांच्या खोट्या आश्वासनांना ‘लॉलीपॉप’ची उपमा दिली.

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले, “फडणवीसांनी गडचिरोलीच्या जनतेच्या समस्या समजून न घेता फक्त आश्वासनांचे लॉलीपॉप दिले.” आंदोलनात आमदार रामदास मसराम, मनोहर पोरेटी, सतीश विधाते, ऍड. कविता मोहरकर, जीवन नाट, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, प्रमोद भगत, वसंत राऊत, प्रशांत कोराम, राजेश ठाकूर, वामनराव सावसागडे, दत्तात्रेय खरवडे, नंदुजी वाईलकर, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

“विकासाचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी काँग्रेसने केली. फडणवीसांच्या उद्घाटन-भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाने राजकीय वातावरण तापवले आहे.

16
780 views