logo

मल्हार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी सुनील मतकर तर महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी कडूबा गवारे यांची निवड.

धनगर समाजाच्या विविध प्रश्ना साठी गेल्या २० वर्षापासून शासकीय दरबारी लढा देऊन धनगर समाजाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देणारी अशी ओळख असणाऱ्या धनगर समाज महासंघाच्या मल्हार सेनेच्या घाटावरील जिल्हा प्रमुखपदी सुनील मतकर तर महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी कडूबा गवारे यांची निवड नुकत्याच २० जुलै रोजी चिखली येथे झालेल्या जिल्हा बैठकीत धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम भाऊ पुंडे, महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अलका गोडे, माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांच्या उपस्थिती मध्ये घाटावरील मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख पदी सुनील मतकर तर महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी कडुबा गवारे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष श्रीरामभाऊ पुंडे तर प्रमुख उपस्थितीत आ. नानाभाऊ कोकरे, विदर्भ अध्यक्ष शरदभाऊ वसतकार, अशोकभाऊ देवकाते, डॉ.सौ.अलकाताई गोडे, अहिल्या महिला प्रदेशाध्यक्ष, मनोहर पाचपोर, मुरलीधर लांभाडे, दिलीप गवारे, शिवलालभाऊ बोंद्रे, प्रविण सरदड, रमेश देढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुनील मतकर व कडुबा गवारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्या यासाठी आंदोलने केले,मोर्चे काढले रास्ता रोको केले मेंढपाळ बांधवांना वनचराई पासेस मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत सुनील मतकर कडूबा गवारे यांची निवड केली त्याच्या माध्यमातून जिल्हात समाज संघटन मजबूत होऊन समाजाच्या प्रश्न मार्गी लागतील अशी आशा यावेळी व्यक्त केली.

11
329 views