logo

काटोल तालुक्यातील चंदनपारडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे...!

.....चंदनपारडीच्या जि. प.शाळेच्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार उघड...!
.....पहिल्याच पावसात शाळेच्या खोलीत शिरले पावसाचे पाणी.
..... गावाकऱ्यात तीव्र संताप, शाळेकरी मुलाचे शाळा साहित्य भिजले.

मूर्ती, ता. काटोल (दि. 23 जुलै 2025):

चंदनपारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुरुस्तीच्या नावाखाली अक्षरशः शासकीय निधीची उधळपट्टी झाली असून, पहिल्या पावसात अर्धवट केलेल्या कामाची पोलखोल उघड झाली असुन विद्यार्थीचे दप्तरं अक्षरशः पाण्याखाली गेल्याचे चित्र मंगळवारला पाहायला मिळाले. त्यामुळे गावाकऱ्यात मोठा संताप व्यक्त केल्या जात आहे.

तालुक्यातील चंदनपार्डी येथे जिल्हापरिषद शाळेच्या दुरुस्ती करिता पाच लक्ष रुपयाच्या निधीची उपलब्धता शासनाकडून करण्यात आली.सहा महिन्यापूर्वी कामाला सुरवात झाली शाळेच्या वर्ग खोलीची थातूर मातुर दुरुस्ती करून खोलीला टाईल्स लावण्यात आली. यातील आणखी काही काम बाकीचं असताना काल 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पडलेल्या मुसळधार पावसाने या कामाच्या दर्जाचे धिंडवडे उडाल्याचे दिसुन आले आहे. आलेल्या पावसाने अक्षरशः दुरुस्ती करण्यात आलेल्या नविन वर्ग खोलीत थेट भिंतीतून व टाईल्स खालून पाणी जिरपून साठल्या गेले.यामुळे शाळेकरी मुलाच्या दप्तरातील सर्व शाळेचे साहित्य भिजून नुकसान झाले. एवढेच नव्हे तर एका वर्ग खोली दुरुस्ती करिता देण्यात आलेला निधी 5 लक्ष असताना सुद्धा नविन खिडकी ऐवजी जुन्याच्या खिडक्या लावण्यात आल्याचा आरोप गावातील सरपंच यांच्या वतीने केलेल्या तक्रारीत केला आहे. एकाकी आलेल्या पावसाने शाळेच्या भिंतीआड विद्यार्थी सुरक्षित नसल्याने यावर शाळेचे मुख्याध्यापक रुपचंद राठोड, शिक्षिका गायकवाड , शिक्षिका धोपटे , सरपंच बंडू ऊईके, उपसरपंच रवि गुंड, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद ढोके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन खवसे आणि संपूर्ण ग्रामस्थ यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

52
2275 views