logo

पारनेर चा डॉक क्लर्क (चिठ्ठीवाला) झाला कादंबरीकार! "आणि रामा कलेक्टर झाला "

रामदास ढोरमले
Aima/डिजिटल बातमी!
पारनेरच्या मातीत जन्म घेऊन,पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक लोक मुंबईत जाऊन वेगवेगळया क्षेत्रात स्थिरावली आहेत अनेकांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे. त्यातअजून एक भर पड़ली आहे. गटेवाडी गावचे रहिवासी असणारे श्री अशोक पवार हे कस्टम एजन्ट साईनाथ क्लीअरिंग एजन्सी नवी मुंबई येथे काम करत
असताना त्यांचा लेखन हा प्रांत
नसून देखील त्यांनी, ... आणी
रामा कलेकठर झाला ही ३००
पांनी कादंबरी लिहली आहे.रविवार १३ जुलै रोजी खासदार श्री निलेश लंके आणि सह आयुक्त श्री विष्णू औटी यांच्या उपस्थितीत लेखकाच्या आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळयात सदर कादंबरीचे प्रकाशन झाले आहे. हमाल ते कलेकटर अस कथानक असणारी कादंबरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण वर्गा साठी मार्गदर्शक ठरेल असे गौरव उदगार विष्णू औटी यांनी प्रकाशन सोहळयात बोलताना काढले. श्री अशोक पवार यांनी आपल्या लेखनातून अस्सल पारनेरी बाज असलेली भाषा वापरून आपल्या ग्रामीण पारनेरी बोलिला न्याय देण्याच काम केल्याचं ही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. हे पुस्तक जरूर घेऊन तरुणांनी वाचलं पाहिजे असं म्हणत त्यांनी सन्मान मूर्ती माजी सैनिक किसन पवार यांच्या सैन्य कारकिर्दीत मिळालेला पुरस्कार
हा तालुक्या साठी भूषणावह असल्याचं सांगितलं. पारनेर ही बुद्धिवंतांचीखाण तर आहेच परंतु इथली माती ही कसदार आणि नवनिम्मिती साठी सुयोग्य आणि पोषक आहे. इथल्या मातीत अनेक
साहित्यिक निर्माण झाले आहेत
त्यांनी कसदार आणि दर्जात्मक
साहित्य निमिती केली असून
आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळयात मुलाच् पुस्तक
प्रकाशन व्हावं ही खूप मोठी
आनंदची बाब असल्याचं खासदार लंके यांनी आपल्या भाषणातुन सांगितले. त्याच बरोबर सन्मान मूर्ती किसन रामदास पवार यांनी सैन्यात केलेल्या पराक्रमाचा व त्याना मिळालेल्या सेना पदकाचा
आम्हा सर्व पारनेर कर जनतेला
अभिमान असल्याचे गौरउदगार
खासदार श्री निलेश लंके यांनी आपल्या भाषणातून काढले. ह्या कार्यक्रमासाठी महत्वाचे कार्यक्रम सोडल्याच ही लंके यांनी सांगितल तर कार्यक्रमातील व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर मंडळींच्या बैठक व्यवस्थेवर भाष्य करत त्यांनी प्रचंड मोठा हशा ही पिकवला.लेखक श्री अशोक पवार यांनी ही प्रास्ताविकात बोलताना आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळयात कांदबरी प्रकाशन होते ही बाब माझ्या साठी आनंददायी क्षण असल्याचं प्रतिपादन केले . पारनेर तालुका
हा संघर्ष करणा्यंचा तालुका असून शिक्षक ते सह आयुक्त, आणि शिक्षक पुत्र ते खासदार असा दोन्ही प्रमुख अतिथी असणाया श्री विष्णू औटी व खासदार श्री निलेश लंके यांचा संघर्षमयी प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे असे उदगार आपल्या भाषणातून व्यक्त केले. ह्या प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर, ग्रामस्थमंडळी.शिक्षक आजी, माजी सैनिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण भागात झालेला हा सोहळा अनेकांचं लक्ष वेधून
घेण्यात यशस्वी ठरला.

102
7689 views