logo

लोणावळा:- महिला उद्योजिकांना प्रगतीसाठी उपयुक्त अशी "उद्यमी लोणावळा" कार्यशाळा.

लोणावळ्यात "उद्यमी लोणावळा" कार्यशाळेचे आयोजन लोणावळा वुमन्स फाऊंडेशन .लोणावळा च्या वतीने हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी लोणावळा
वुमन्स फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा ,ब्रिंदा गणात्रा या म्हणाल्या ,की लोणावळा शहर परिसरातील उद्योजक, उद्योमी,महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी , तसेच महिला च्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोणावळा वुमन्स फाऊंडेशन ची २०१९ सुरवात झाली.
तेव्हापासून मोठ्या. संख्येने उद्योगात,उत्साही,उद्यमी महिलांनी फाऊंडेशन चे सभासदत्व स्वीकारले आहे आणि मोठ्या संख्येने महिला यात सहभागी आहेत.
लोणावळा शहर,परिसरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालना देण्याचा माझा मानस आहे. असे लोणावळा वुमन्स फाऊंडेशन.च्या संस्थापक,अध्यक्षा ब्रिंदा गणात्रा यांनी आपल्या अभिभाषणात बोलताना व्यक्त केले.
या उद्यमी लोणावळा कार्यशाळेच्या मार्गदर्शक छाया कोळेकर यांनी महिलांना कोणकोणते,उद्योग कसे करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,.व्यवसाय कसा करायचा कधी कोठे करायचा याची संपूर्ण माहिती महिलांना या कार्यशाळेत दिली. तसेच काही उद्योगी महिलांनी व्यवसायाबद्दल आवश्यक माहिती विचारली त्याला कोळेकर मॅडम यांनी उत्तरे दिली .
महिलांनी स्वयंरोजगाराच्या आणि उद्योगात येणाऱ्या विविध संधीचा फायदा घेऊन एक उत्कृष्ठ उद्योजक म्हणून आपले स्वप्न पूर्ण करावे.
यासाठी स्वतःचा आत्मविश्वास व व्यवसाय करण्याची ताकद निर्माण करून स्वतःचा व्यवसाय उभा करणे हे उद्दिष्ठ ठेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यशाळेच्या मार्गदर्शक, छाया कोळेकर यांनी उद्यमी महीलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या उद्यमी कार्यशाळेच्या कार्यक्रमात . याप्रसंगी उद्यमी महिलांसह, लोणावळ्यातील माजी नगरसेविका,गौरी मावकर,मंदा सोनवणे,जयश्री आहेर,अपर्णा बुटाला सुवर्णा अकोलकर आणि स्वतः माजी नगरसेविका,लोणावळा वुमन्स फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा ब्रिंदा गणात्रा व लोणावळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच लोणावळा नगरपरिषद माजी नगरसेवक,भाजपा देविदास कडू,माजी शहरध्यक्ष, भाजप दादा धुमाळ, तसेच हिंद विजय नागरी पतसंस्था मर्यादित.तळेगाव दाभाडे,संस्थापक Adv.रवींद्र दाभाडे. शहरातील पत्रकार बंधू आणि लोणावळा व परिसरातील उद्यमी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अफरिन खान,गौरी शाह यांनी केले आभार शहनाज बेग यांनी केले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.

6
205 views