
टाकळी प्र चा येथे दूषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात….
टाकळी प्र चा येथे दूषित पाण्याचा पुरवठा
दूषित पाणीपुरवठा ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे अतिसार, कॉलरा, टायफॉइड, आमांश आणि पोलिओ यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रसार होतो आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येते.
हे आजार पण होऊ शकतात
जीवाणू आणि परजीवीमुळे होणारे आजार जसे की जीआर्डियासिस, क्रिप्टोस्पोरिडिओसिस, ई. कोलाई संसर्ग, नॉरोव्हायरस संसर्ग.
सध्या टाकळी प्र चा येथे दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य अधिकारी यांचे जनतेच्या प्रती दुर्लक्ष होत आहे असे दिसून येत आहे. शिवशक्ती नगर,सम्राट नगर,सप्तशृंगी नगर अशा ठिकठिकाणी पाण्यामध्ये जी पहिल्यासारखी गोडी होती. ते पाणी आता बेचव झाले आहेत. हे पाणी रोगराईला आमंत्रित करत आहे. आरोग्य अधिकारी व पाणीपुरवठा विभाग हे जनतेच्या जिवाशी खेळत आहे. गेल्या २०,२५ दिवसांनंतर ग्रामपंचायत हद्दीत पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे त्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, नागरिकांना गढूळ, दुर्गंधीयुक्त व आरोग्यास हानिकारक पाणीपुरवठा होत असून पाण्यात माती,व इतर अपद्रव्य आढळून येत आहे.