logo

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात, इंग्रजी दिवस साजरा.

अडावद ता. चोपडा जि. जळगांव येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी इंग्रजी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक आठवड्यात शनिवारी इंग्रजी दिवस साजरा करण्यात येतो. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर होते. विचार मंचावर श्री एस ए सावळे सर, श्री टी डी पाटील सर, श्रीमती एस आर बोरसे मॅडम, श्री के बी पाटील सर, श्री व्ही जे महाजन सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी, इंग्रजीत सूत्रसंचालन, इंग्रजी कविता सादर करणे, संभाषण कौशल्य, मुलाखत, थोर नेत्यांचे विचार विद्यार्थ्यांनी इंग्रजीत सादर केले. इंग्रजीचे शिक्षक श्री एस ए सावळे सर यांनी इंग्रजी चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संपूर्ण कार्यक्रमाची नियोजन श्री व्ही जे महाजन सर यांनी केले होते. अध्यक्षीय भाषणात श्रीमान के आर कणखरे सर यांनी इंग्रजी ज्ञान प्राप्त करण्याची भाषा असून, आपल्याला इंग्रजीने किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे फोटोग्राफी श्री एस आर महाजन सर, व श्री एस डी खोडपे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

13
446 views