logo

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यांची धडक कारवाई; सुमारे दोन लाखाच्या गांज्यासह मुद्देमाल जप्त



कोल्हापूर – कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हुपरी पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई केलीय. यामध्ये 1 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,90,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

याबाबतची माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा, अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलीस पथक नेमलं. दरम्यान, हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील संभाजी माने नगर झोपडप‌ट्टी परिसरात एक इसम मोटर सायकलवरून गांजा विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगानं उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावला. यामध्ये संभाजीनगर, हुपरी येथील मोहिन मौनुद्दीन मुजावर यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील गांजा 1 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,90,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात हुपरी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास हुपरी पोलीस करतायत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, अशोक पोवार, अमित सर्जे, सागर चौगले, शुभम संकपाळ, विशाल चौगले, महेश पाटील, संजय कुंभार, अनिल जाधव यांच्या पथकानं केलीय.

0
0 views