
गरजू मुलांना पॅरामेडिकल कोर्स फ्री ऍडमिशन.
अखिल मातंग समाज चळवळ महा. राज्य च्या वतीने दिले.
सविस्तर वृत्तांत - पुणे, सातारा व अहिल्यानगर या जिल्ह्यातील गरजू व मेडिकल क्षेत्रात योगदान देण्यासाठी 10 वी,व 12 पास झालेल्या मुलांना अखिल मातंग चळवळ महा. राज्य या अग्रेसर चळवळी च्या प्रयत्नातून या जिल्ह्यातील मुलांना फ्री ऍडमिशन करून दिले.
डॉ.गणेश अंबिके सर संस्थापक अध्यक्ष मोरया सामाजिक प्रतिष्ठान आणि लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप पॅरामेडिकल कॉलेज यांचे सहकार्य व श्री संतोष चव्हाण सर केंद्र प्रमुख लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप पॅरामेडिकल कॉलेज तसेच सौ.आरती विभुते (फल्ले) प्रशासकीय प्रमुख मोरया सामाजिक प्रतिष्ठान आणि सौ.मेघना ठाकूर अकॅडमीक इन्चार्ज लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप पॅरामेडिकल कॉलेज,अक्षय किर्वे प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन्चार्ज लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप पॅरामेडिकल कॉलेज, या सर्वांच्या उपस्थित व अखिल मातंग चळवळ चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या मुलांना ऍडमिशन करून दिले.
डॉ.श्री.गणेश अंबीके यांनी चळवळी च्या या कामाबद्दल विशेष आभार मानून सर्वांचा सत्कार केला. चळवळी चे सर्वो सर्वे श्री. शिवाजी अस्वार सर यांनी पुढील वर्षी चळवळी च्या वतीने कमीत कमी 100 मुलांना या पॅरामेडिकल कोर्स साठी ऍडमिशन दिले जाईल असे अस्वसन दिले.
बातमीदार -
काळुराम राजगुरू,पुणे
Mo. 9604525101