logo

नाशिकमध्ये पहिल्या श्रावण सोमवाराची मोठ्या भक्तीभावाने उत्साहात सुरुवात

प्रतिनिधी २८ जुलै (नाशिक) :- महाराष्ट्रामध्ये नुकताच श्रावण महिना सुरू झाला असून आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या श्रावण सोमवाराच्या निमित्ताने अनेक भक्तांनी महादेवाच्या मंदिरांमध्ये भगवान शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. या भक्तांची गर्दी अगदी सकाळपासूनच सुरू झाली आहे.

भगवान शिव शंकराच्या पिंडीला काही भाविक दुधाने अभिषेक घालत आहेत तर काही भाविक जलाने अभिषेक घालत आहेत. या अभिषेकाच्या माध्यमातून भक्तांची भगवान शिवशंकरावर असलेली श्रद्धा व्यक्त होत आहे. काही भक्त महादेवाला नारळ फोडून, फुलांचा हार घालून तसेच फुले वाहून पूजा करत आहेत. प्रसादासाठी पेढे, नारळ, अन्य प्रकारचे प्रसाद वाटले जात होते.

मंदिरामध्ये धूप, अगरबत्ती लावल्यामुळे मंदिर परिसरामध्ये वातावरण सुगंधित झाले आहे. दर्शनासाठी पुरुष, महिला तसेच लहान मुले यांनीही हजेरी लावली होती. यामध्ये महिलांचा विशेष सहभाग बघायला मिळाला. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भगवान शिवशंकर की जय, भोलेनाथ महाराज की जय अशा शिवशंकराच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून निघाला होता.

12
1871 views