logo

*ब्रह्माकुमारीज मीडिया विंग कडून `मूल्यनिष्ठ पत्रकारिता`या विषयावर चर्चा सत्र.*

*ब्रह्माकुमारीज मीडिया विंग कडून
`मूल्यनिष्ठ पत्रकारिता`या विषयावर चर्चा सत्र.*

#मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांचे पत्रकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन#


वाशिम | प्रतिनिधी

सायबर युगात झपाट्याने बदलणाऱ्या पत्रकारितेच्या स्वरूपात मूल्यांचा ऱ्हास होत चालल्याची जाणीव अनेक माध्यम प्रतिनिधींना होत आहे. याच पार्श्वभूमीवर "सायबर युगातील माध्यमे आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता" या विषयावर वाशिम जिल्हास्तर मीडिया चर्चासत्राचे आयोजन शनिवार, दि. 02 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत करण्यात आले आहे. हे चर्चासत्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ‘वरदानी भवन’, सिव्हिल लाईन्स, सर्किट हाऊसच्या मागे, वाशिम येथे होणार आहे.
या चर्चासत्राचे आयोजन ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग (RE & RF), माऊंट आबू व ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य :
माध्यमांना समाजाचे दर्पण मानले जाते. मात्र 'पेन' पासून 'पेनलेस' पत्रकारितेकडे वाटचाल करताना अनेक मूल्यमापनांचे प्रश्न उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर माध्यमांतील मूल्यांची पुनर्स्थापना, नैतिक अधिष्ठान आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर सायबर पत्रकारितेच्या नव्या शक्यता, डिजिटल माध्यमांचे प्रभाव, आणि मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या गरजा या मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा होणार आहे. माध्यमांच्या विश्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती साधताना नैतिक अधिष्ठान कसे टिकवावे, यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते म्हणून ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी (राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू), प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे (महाराष्ट्र राज्य मीडिया समन्वयक, जळगाव), श्री. राजेश राजोरे (खामगाव, अकोला क्षेत्रीय मीडिया समन्वयक) तसेच स्थानिक ज्येष्ठ मीडिया प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधींना सहभाग घेता येईल. यासाठी कुठलेही नोंदणी शुल्क असणार नाही, मात्र सहभाग ई-प्रमाणपत्रासाठी नोंदणी आवश्यक आहे. https://tinyurl.com/BkMahaMedia या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. लिंक प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नोंदणीसाठी संपर्क : 9850693705 हा आहे.
या चर्चासत्रात वृत्तपत्रे, प्रिंट मीडिया, टी.व्ही., रेडिओ, केबल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सायबर व सोशल मीडिया, पत्रकारिता शिक्षण संस्था, जाहिरात व जनसंपर्क क्षेत्रातील प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे ब्रह्माकुमारी स्वातीदीदी, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, वाशिम यांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
🌐 www.mediawing.org | www.BkMahaMedia.com/bkwashim
📞 संपर्क : 9822593903
ब्रह्माकुमारी स्वातीदीदी,, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, वाशिम
वाशीम जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या प्रतिनिधी व पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी केले आहे.

36
701 views