logo

मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या; बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी..!

शिंदखेडा.जि.धुळे (सारनाथ बोरसे)-30/07/2025.बिजसनी मंगल कार्यालय ते वरपाडा रोड चौफुली या शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जाणवरांचा मुक्त संचार आणि ठिय्या मारल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे वाहन चालकांना जाणवरांच्या बाजूने वळण घेत पुढे जावे लागत होते.या कारणामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोकाट जनावरे शिवाजी चौफुली पासून ते थेट वरपाडा चौफुली पर्यंत मुख्य रस्त्यावर बसत असतांनाचे चित्र सद्या दिसत आहेत.
नगर पंचायत च्या संबंधित विभागाने ती मोकाट जनावरे ताब्यात घेऊन त्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.पावसाळा सुरु असल्याने रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत,त्यात या मोकाट जाणवरांची भर पडली आहे.पावसामध्ये वाहन चालकांना त्या मोकाट जनावरांचा त्रास होत आहे.काही वेळा अपघातही झालेले आहेत.शाळा कॉलेज चालू झाली असून विध्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.म्हणून शिंदखेडा नगर पंचायत ने दक्षता घेतली पाहिजे.या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन शिंदखेडा नगर पंचायत च्या संबंधित विभागाने या मोकाट जाणवरांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होतांना दिसत आहे....!!


बातम्यासाठी संपर्क करा---
सारनाथ बोरसे सर-8421369491🙏🙏

31
1673 views