logo

महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे

महाराष्ट्रातील संपूर्ण महार वतन जमिनी वरील झालेल्या अनधिकृत पणे खरेदी विक्रीचे व्यवहार अनधिकृत नोंदणी झालेले साठेखत अनधिकृतपणे केलेले कुलमुखत्यार पत्र अनधिकृतपणे असलेले अतिक्रमण तसेच कुलमुखत्यार पत्र व साठेखत याद्वारे झालेले खरेदीखत तात्काळ रद्द करणे महार वतन जमिनीवर लागलेले कुळ हटवून जमीन वतनदारास हस्तांतरित करा जमिनीवर झालेले अनधिकृत व्यवहार तात्काळ रद्द करून जमीन महार वतनदारांना पुन्हा रिस्टोर करा अशा विविध मागण्यांसाठी उपोषण कर्ते शशिकांत दारोळे हे दिनांक 06/08/2025 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करणार आहे,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे हे गेली चार ते पाच वर्षापासून महार वतन जमिनी संदर्भामध्ये सतत आवाज उचलत आहे महार वतन जमिनीवर झालेले अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करा महार वतन जमिनी अनधिकृतपणे सवर्णवर्गानी धाकदडप शाही करून बळकविल्या आहेत त्या जमिनी तात्काळ वतनदारास पुन्हा हस्तांतरित करा तसेच महार वतन जमिनीवर झालेले अनधिकृतपणे अतिक्रमण तात्काळ हटवून जमिनी मूळ मालकास परत करा अशा विविध मागण्यांसाठी शशिकांत दारोळे यांच्या वतीने मुंबई नाशिक, पुणे, सातारा या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलेले आहेत परंतु आज रोजी पर्यंत प्रशासनाने अशी कोणतीही ठोक भूमिका घेतलेली निदर्शनात आलेली नाही परंतु या सर्व विषयाच्या अनुषंगाने पाठपुरावा करता असे निदर्शनास आलेले आहेत की प्रशासनाच्या संगणमताने आणि राजकीय पुढारी यांच्या वर्चस्वाने महार वतन जमिनीवर अनधिकृत पणे धाकदडपशाही करून अनधिकृत पणे खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदनी करून तसेच गावातील राजकीय पुढारी यांच्या हस्तक्षेप असल्यामुळे महार वतन जमिनी महार वतनदारांच्या ताब्यात राहिलेल्या नाहीत तसेच जाणीवपूर्वक सवर्णवर्गाने सावकारांनी कवडीमोल भावात पन्नास रुपये शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर सहया घेऊन महार वतन जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आढळतात आज रोजी सुद्धा असे प्रकार आपल्या निदर्शनास येत आहेत आपण बघितले तर पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये महार वतन जमिनी हजारो एकर मध्ये आहेत परंतु कित्येक महार वतन जमिनीवर अनधिकृतपणे मोठ मोठया कंपन्या उभारलेल्या दिसतात तसेच भूमाफीया बिल्डर यांनी अनधिकृतपणे बिल्डिंगचे बांधकामे केलेली आढळतात राजकीय पुढार्‍यांचे कारखानदारी, कार्यालय, पेट्रोल पंप,महार वतन जमिनीवर असलेले आपल्या निदर्शनात येते परंतु गरीब कुटुंबातील महार वतनदार असल्या कारणास्तव जमीन कसणे हा एक पर्यायी मार्ग आहे त्यावर त्याच्या कुटूंबाची उपजीविकेचे साधन आहे परंतु आज जमीन कसून मोबदला मिळविणे सुद्धा अश्यक्य झाले आहे महार वतन जमिनी या अनधिकृतपणे दडपशाही करून अतिक्रमण करणे हे राजरोष पणे सुरू आहे याच्यावर प्रसासनाचा वचक राहिलेला नाही या सर्व विषयाचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांना तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत परंतु कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही जिल्हाधिकारी यांच्याकडे संपूर्ण अधिकार आहेत जसे इनाम जमीन, महार वतन जमीन यांची हस्तांतरण परवानगी घेतल्या शिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार अनधिकृत व्यवहार ठरविले जातात परंतु जिल्हाधिकारी यांची हस्तांतरण परवानगी न घेता कित्येक व्यवहार आज रोजी अनधिकृतपणे होत असलेले आपल्या निदर्शनास येत आहे परंतु जिल्हाधिकारी या विषयावर कोणतीही कारवाई करत नाही राजकीय पुढाऱ्यांचा दबाव आहे की काय असे आपल्याच बघावयास मिळेल, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सर्रासपणे महार वतन जमिनींचे साठेखत व त्याच बरोबर कुलमुक्तार पत्र होऊन खरेदी घेणार महार वतन जमिनीचा ताबा घेऊन अनाधिकृतपणे जमिनीवर बांधकाम करणे कंपनी उभारणे जमिनीची गुंठेवारी करणे प्लॉटिंग करणे असे कित्येक व्यवहार करत आहेत याकडे जिल्हाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे महार वतनदार गरीब असल्या कारणामुळे दाद तरी कोणाकडे मागणार आणी जिल्हाधिकारी आलेल्या तक्रारी कडे लक्ष केंद्रित करत नाही असे घडणारे कित्तेक गैरप्रकार हे आपल्याला बघावयास मिळत आहेत जमिनीचे अनधिकृतपणे लाखो कोटी रुपयांचे व्यवहार करून जमिनीच्या व्यवहारापोटी साठेखत करून जमीन मालकास पाच ते दहा लाख रुपये देऊन साठेखत करून व कुलमुक्तार पत्र करून जमिनीचे संपूर्ण हक्क जमीन घेणार आपल्या नावे करत आहेत जसे जमीन विक्रीच्या अधिकार, जमीन हस्तांतरण करणे, जमीन हस्तांतरण परवानगी आणणे, जमिनीचे दावे दाखल करणे असे संपूर्ण व्यवहार कुलमुखत्यार पत्र मध्ये नमूद करून कुलमुखत्यार पत्र नोंदविले जाते व जमीनदारांची पुढील व्यवहाराची फसवणूक करून पुढील व्यवहार अपूर्ण ठेवून महार वतनदाराची फसवणूक करतात संपूर्ण जमिनीवर आपला हक्क बजावतात असे कित्येक प्रकार आपल्याला निदर्शनास आहे, व कुलमुक्त्यार पत्रामुळे फसवणूक झालेली लक्षात आल्यानंतर वतनदारांना कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी जावे लागते अशा कित्येक केसेस कोर्टामध्ये वर्षानुवर्षे पेंडिंग आहेत, तसेच हजारो केसेस जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल आहेत परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे या विषयाच्या अनुषंगाने महार वतनदार यांना जमिनीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र प्रशासनाच्या व राजकीय पुढारी तसेच भूमाफिया यांच्या संगनमताने होत असलेले आपल्या निदर्शनात येत आहे या सर्व विषयाच्या अनुषंगाने शशिकांत दारोळे यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय, मंत्रालय मुंबई यांना तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केलेले निदर्शनात आलेले आहे परंतु महार वतन जमिनी या वतनदारांचा वडिलोपार्जित कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेल्या जमिनी आहेत जमिनीसाठी पूर्वजांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले आहे या सर्व पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला असणाऱ्या महार वतन जमिनी या प्रोटेक्टेड जमिनी आहेत व या जमिनीवर सुरू असलेला जाणीवपूर्वक गैरप्रकार महार वतन जमिनी लाटण्याचे षडयंत्र तात्काळ बंद करून महार वतन जमिनी महार वतनदारांना पुन्हा (रिस्टोर) करा परत करा या मागणीसाठी पुन्हा आझाद मैदान आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे तरीही ज्या महार वतनदारांच्या जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असेल महार वतन जमिनीचे अनधिकृतपणे व्यवहार करून फसवणूक केलेली असेल अशा सर्व बांधवांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन उपोषणामध्ये आपला सहभाग नोंदवावा पाठिंबा द्यावा व तक्रार अर्ज जमा करावे असे आवाहन शशिकांत दारोळे यांनी केले आहे,

8
114 views