logo

भारती विद्यापीठ: विधीसंघर्षीत बालकाकडुन ४ वाहन चोरीचे गुन्हे उघड पोलीसांची काशल्युपर्ण कामगिरी

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा शोथ घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी च तपास पथकातील पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधीसंघर्षीत बालक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) या गुन्हयातील चोरीस गेली दुचाकी गाडी क्रमांक ग्तर सड३०१२ हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडून सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

नमुद बालकाकडे अधिक तपास करता त्याचेकडुन आणखीन ३ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्याचेकडुन १. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) २. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४७/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) ३. सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचा एक गुन्हा ४. नांदेड सिटी पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचा एक गुन्हा असे एकुण ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, दिनेश टपके, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, महेश बारयकर, मंगेश पवार, निलेश खखैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

23
1817 views