हुमणी अळीच्या प्रकोपाने शेतकरी राजा गारद ; तत्काळ नुकसान भरपाई द्यावी : शिवसेना नेते ओम पऱ्हाड यांची मागणी
देऊळगाव राजा: परिसरात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून यामुळे ऐन बहरात आलेले सोयाबीन आणि मका या सारखे पिके दिवसेंदिवस सुकत चालले आहे. या झालेल्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे उत्पन्न घटण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान पिक उत्पादन होण्यापूर्वीच झालेले आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
यामध्ये परिसरातील सुरा, सरंबा, डिग्रस बु , अंढेरा , सेवानगर, पाडळी शिंदे , मेंडगाव, बायगाव , सावखेड नागरे, शिवणी आरमाळसह परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करून जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. या परिसरात सोयाबीन,कपाशी, मका , उडीद, मूग , तूर या पिकांवर मोठया प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आणखी प्रतीक्षा करायला न लावता लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शिवसेना युवा नेते ओम पऱ्हाड यांनी केली आहे.