logo

वास्तू व ज्योतिष तज्ञ डॉक्टर वैभव बेर्डे इस्लामपूर यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित

इस्लामपूर येथील प्रसिद्ध वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र विशारद डॉ. वैभव सुभाष बेर्डे यांना वैदिक वास्तुशास्त्र या विषयाच्या अभ्यासाबद्दल मॅजीक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजीक अँड आर्ट युनिव्हर्सिटी दिल्ली यांच्याकडून डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. वैभव बेर्डे हे गेल्या पंधरा वर्षांपासून वैदिक वास्तुशास्त्राचा अभ्यास करून सेवा देत आहेत. एखाद्या वास्तूचा अभ्यास करून येथे असणारे गुण दोष उदाहरणासह स्पष्ट करून दाखवून त्यातील दोषांचे अतिशय अभ्यासपूर्णपणे निवारण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अनेक लोकांना लाभ झालेला आहे. वैदिक वास्तुशास्त्रातील त्यांचा गाढा अभ्यास,संशोधन आणि समर्पित कार्य हे खूप मोठे आहे. त्यामुळे अनेक लोक आपले व्यावसायिक आणि घरगुती जीवन अतिशय समाधानकारक पणे जगत आहेत.डॉ. वैभव बेर्डे म्हणजे वेदिक वास्तुशास्त्रातला जणू कोहिनूर हिरा लोकांना लाभलेला आहे. या संपूर्ण कार्यासाठी डॉक्टर बेर्डे यांना वास्तुगुरु यशवंत मगिरवार, डॉ.धुंडीराज फाटक, सचिन बेहेरे,डॉ.नरेन उमरणीकर, डॉ.नरेंद्र सहस्रबुद्धे. आदी मान्यवराचे मार्गदर्शन लाभले. वास्तुविशारद डॉक्टर वैभव बेर्डे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

12
155 views