
मन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार*
मन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार*
(सादिक शाह रायपूर)
आज दि. २६ जूलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता जनता विद्यालय पिंपळगाव सराई मध्ये परिसरातील दातृत्व हा गुण अंगी असलेले हाजी शे. फारूख शे- ममलु मुजावर अध्यक्ष, ग्राम सेवा सहकारी सोसायटी पि. सराई, व मन्नत फाउंडेशन सैलानी यांच्या हस्ते वारकऱ्यांचा पोशाख तसेच पुष्पमाला देऊन सत्कार करण्यात आला.
"देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या" .या अभंगाप्रमाने पांडुरंगाला क्षणभर डोळ्यामध्ये साठवण्यासाठीचा हा वारीचा अट्टाहास.
याच गोष्टीचा ध्यास विद्यार्थ्यांना लागावा व विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी , व परिसरात हिंदू मुस्लिम एकता ची भावना निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी (सलग तीन वर्षा पासुन) या कार्यक्रमाचे स्व खर्चाने आयोजन हाजी शे. फारुख सेठ करत असतात अशा वारकऱ्यांना पोशाखरुपी भेटवस्तू , वारकरी पोशाख,शाल व मिठाई देऊन त्यांचे स्वागत करत असतात. यावर्षी या सोहळ्यात शिवानी शंकरराव लोखंडे (जालना), शोभा शिवाजी लोखंडे (बुलडाणा) रामदास खंडागळे (बोरगाव काकडे)
डासालवाडी येथील अरुण माणिकराव रिंढे, आनंदा संपत शेवाळे, रामेश्वर किसन शेवाळे, समाधान प्रभात मापारी , शिवाजी लोखंडे,गजानन दगडू शेवाळे,विनोद हिंमतराव शेवाळे, कैलास दामोदर शेवाळे, बुलडाणा येथील उषा धामोडे व पिंपळगाव सराई येथील वत्सलाबाई प्रल्हाद पाटोळे या सर्व वारकऱ्यांचे शाल, वारकरी पोशाख ,व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच बुलडाणा येथील उषा धामोडे व शोभा शिवाजी लोखंडे यांच्या तर्फे हाजी शेख फारुक मुजावर यांना रुमाल व कपडे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन अजहर पठाण, रामेश्वर तायडे, शिवाजी लोखंडे, मदनराव गवते , शेख साजेद शेख फारुक मुजावर यांनी केले तर अध्यक्षीय भाषण विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रमोदजी ठोंबरे सर यांनी केले. कार्यक्रमाला हाजी शेख इब्राहीम मुजावर, शिवाजी लोखंडे, रामेश्वर तायडे, अजहर पठाण, मदनराव गवते, रामेश्वर शेवाळे, शेख साजेद शेख फारुक मुजावर आदीची उपस्थिती होती,
सूत्र संचालन गजानन पाटोळे यांनी केले तर आभार संजय पिवटे यांनी मानले कार्यक्रमात जनता विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी बंधू भगिनीचे सहकार्य लाभले.