logo

नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेलचा नववा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

आज दि . २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:००
स्थळ: पनवेल
प्रेषक: नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेल

नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेलचा नववा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

निसर्गसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेल या संस्थेचा नववा वर्धापन दिन श्री संत सावता माळी सभागृह, तक्का-पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती:

मा. श्री. गजानन पानपट्टे – वनपरिक्षेत्र अधिकारी, पनवेल (RFO)

मा. श्री. उल्हास ठाकूर – माजी मानद वन्यजीव संरक्षक, रायगड

मा. श्री. प्रदीप साठे – डायरेक्टर, स्वदेश फाउंडेशन

मा. श्री. मयूर नाईक – सुप्रसिद्ध गायक

डॉ. ओमकार सरदार – पशुवैद्य

डॉ. निखिल भोपळे – विश्वस्थ, ग्रीन वर्क्स ट्रस्ट

मा. श्री. अशोक निकम – अ नि स.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष उदरे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या मागील नऊ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा सादर केला. यामध्ये विशेषतः खालील कार्यांचा समावेश आहे:

४८६१ वन्यजीवांचे रेस्क्यू आणि नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन

७७ हून अधिक जनजागृती कार्यक्रम

११ निसर्ग शिबिरे व ९ शाळांमध्ये पर्यावरण विषयक स्पर्धांचे आयोजन

२० हून अधिक जखमी वन्यजीवांवर उपचार (वन्यजीव प्रथमोपचार केंद्राच्या माध्यमातून)

११ सर्पदंश पीडितांना वैद्यकीय मदत

वृक्षारोपण, वणवा नियंत्रण, ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन

वनविभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग


कार्यक्रमात "स्व. संतोष नामदेव फडके स्मृती सर्वोत्तम स्वयंसेवक पुरस्कार २०२४-२५" हा कुमार आर्यन संतोष उदरे याला प्रदान करण्यात आला. तसेच, "सर्वोत्तम सर्प रेस्क्युअर पुरस्कार" श्री. बाबू शेख यांना प्रदान करण्यात आला.

नागपंचमी निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील यावेळी संपन्न झाले. पळस्पे, शिरढोण, सोमटणे व शिवकर येथील चार माध्यमिक शाळांमधून १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध शाळांमधील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मान्यवरांची मनोगते:

डॉ. निखिल भोपळे, श्री. मयूर नाईक, डॉ. ओमकार सरदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

श्री. प्रदीप साठे, मा. उल्हास ठाकूर, आणि कार्यक्रमाध्यक्ष श्री. गजानन पानपट्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणे दिली.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. परशुराम पाटील सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. सुशांत वेदक यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचे पालक, विविध पर्यावरणप्रेमी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर अशा २०० हून अधिक लोकांची उपस्थिती लाभली.


https://youtu.be/GpRqYoKtLvI





88
3412 views