logo

शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा संपन्न.*

*शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा संपन्न.*

*शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी यांचेवतीने शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज यड्रॉव येथे विध्यार्थ्यांच्याकरीता " मिशन झिरो ड्रग्ज " या मोहिमेअंतर्गत व्याख्यान आयोजित केले होते.याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,लायन्स क्लब व रामबाबु शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांचे सहकार्य लाभले.*
*याप्रसंगी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा महावीर कुटे यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन झिरो ड्रग्ज या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर पोलीस दलासह शहापूर पोलिसांनी किती व कसे गुन्हे दाखल केले आहेत याबाबत सखोल माहिती देत ड्रग्ज ( मादक पदार्थ ) हे मानवी जीवनासाठी किती घातक आहे व विध्यार्थ्यांनी त्यापासून दूर कसे राहावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.*
*मोटार वाहन निरीक्षक स्वरूपा नांगरे मॅडम यांनी रस्ता सुरक्षा विषयी बोलताना वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत.ड्रिंक अँड ड्राईव्ह,मोबाईल टॉकिंग याविषयी सखोल मार्गदर्शन केले.विध्यार्थ्यांनी लायसन्स काढले शिवाय मोटारसायकल वापरू नये.हेल्मेट व सिटबेल्टचा वापर नेहमी करावा तसेच भरधाव वेगाने वाहन चालवू नका असा मोलाचा सल्ला दिला.*
*लायन्स क्लबचे प्रशासक लिंगराज कित्तुरे यांनी संस्कारक्षम पिढी कशी असावी व त्यासाठी विध्यार्थ्यांनी आपले आचरण कसे ठेवले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.*
*यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष संदिप सुतार,शहापूर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी शशिकांत डोणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे, कॉलेजचे विध्यार्थी-विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*स्वागत व प्रास्ताविक कॉलेजचे उपप्राचार्य एम एम कुंभार सर यांनी केले तर आभार एस एस यादव सर यांनी मानले.*

7
238 views