काटोल तालुक्यातील खैरी चिखली येथे 1984 पासून आजतागायत अनुसूचित जातीच्या सरपंच पदाचे आरक्षण वंचित...
काटोल प्रतिनिधी - काटोल तालुक्यातील खैरी चिखली येथे 1984 पासून अनुसूचित जातीचे आरक्षण नाही.व या गावात अजून पर्यंत अनुसूचित जातीचे एकदा आरक्षण आले होते. परंतु राजकीय लोकांच्या खेळीमुळे अनुसूचित जातीच्या लोकांना 1984 पासून आतापर्यंत सरपंच पदापासून वंचित ठेवले निवडणूक आयोगाला वेळोवेळी पुरावे व कागदपत्रे सादर करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले . जवळजवळ एक वर्षाचा काळ लोटून सुद्धा उत्तर मिळेना.जर उत्तर मिळाले नाही तर खैरी येथील ग्रामपंचायत सदस्य अंकित दशरथजी रंगारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात पैदल वारी करणार असून या गोष्टीला न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.