logo

साखरखेर्डा मंडळातील हुमनी अळीचा प्रादुर्भाव सर्वे कधी करणार साखरखेर्डा ( वार्ताहर )

साखरखेर्डा मंडळातील हुमनी अळीचा प्रादुर्भाव सर्वे कधी करणार
साखरखेर्डा ( वार्ताहर )
साखरखेर्डा मंडळात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली , परंतू शासकीय अधिकाऱ्यांनी कोणताही शेतात जाऊन पाहणी केली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . तरी कृषी अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी केली आहे .
साखरखेर्डा मंडळात साखरखेर्डा , शिंदी , राताळी , मोहाडी , सवडद , गुंज , सावंगी भगत , वरोडी , उमनगाव , गोरेगाव , पिंपळगाव सोनारा , तांदुळवाडी या भागातील शेतकरी हुमणी अळीमुळे परेशान झाले आहे . काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पीक वखरुन दुबार पेरणी केली आहे . सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा भाग वगळून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केल्याचे समजते . परंतू साखरखेर्डा मंडळातील हुमनी अळीचा सर्वे केल्याचे कोठेच दिसत नाही . शेतकऱ्यांनी अगोदरच महागडी खते , बियाणे खरेदी करून पेरणी केली . आज काही भागातील सोयाबीन चांगली बहरली तर काही शेतकऱ्यांच्या नशिबी हुमणी अळी आल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे . साखरखेर्डा येथील अमरसिंग शामलाल परदेशी यांच्या गटनंबर ८१५ मधील ५ एकर शेतीत सोयाबीनचा पेरा केला आहे . आज हुमणी अळीमुळे पाच एकरातील सोयाबीन नष्ट झाले आहे . साखरखेर्डा भाग २ मधील अनेक शेतात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात आहे . सवडद येथील तेजराव देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे . राताळी , मोहाडी भागातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे . याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे .
फोटो :---- अमरसिंग परदेशी यांच्या सोयाबीन पिकावर हुमनी अळी दाखविताना

1
642 views