logo

साने गुरुजी विद्यालयामध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांना मार्फत मोफत शालेय गणवेशाचे वाटप.

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालय बोर्ली, तालुका मुरुड, जिल्हा रायगड. हे पंचक्रोशीतील सर्वात जुने विद्यालय असून विद्यालयांमध्ये आजूबाजूच्या परिसरातील गरीब व आर्थिक दुर्बल घटकांमधील आदिवासी, कोळी व आगरी इत्यादी समाजातील विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात.
विद्यालयाच्या चालू शैक्षणिक वर्ष 2025/26 मध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाची निकड लक्षात घेता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ( श्री शामकांत डयला, श्री. अविनाश शिणे गुरुजी व श्री.सी.आर. भोईर साहेब) यांनी स्वतः अर्थसहाय्य करून विद्यालयाच्या एकूण 75 मुले व मुली यांना मोफत गणवेश मिळवून देण्याची तजवीज केली.
शुक्रवार, दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयामध्ये पालक सभेचं औचित्य साधून पालकांना विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश प्राप्त झाल्यानंतर पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून गेला.
ज्यांच्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले त्या माजी विद्यार्थ्यांचे संस्था शाळा प्रशासन आणि पालक यांनी जाहीरपणे आभार मानले.

29
2089 views