सायबर युगातील पत्रकारितेत मानवी संवेदना आणि वास्तवदर्शनावर आधारीत पत्रकारीतचे मूल्य जपण्याचे आव्हान डॉ सोमनाथ वडनेरे, यांनी केले.
सायबर युगात मानवी संवेदना आणि वास्तवर्शी वृत्तांकनाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले
सायबर युगातील माध्यमे आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता विषयावर
वाशिम जिल्हास्तर मीडिया चर्चा सत्रामध्ये मार्गदर्शन केले
वाशिम -:- नवीन माध्यम तंत्रज्ञान आणि सायबर युगात पत्रकारिता करतांना मानवी संवेदना व वास्तवदर्शी वृत्तांकन आवश्यक असल्याचे प्रतिपादन सायबर युगातील माध्यमे आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता विषयावर वाशिम जिल्हास्तर मीडिया चर्चासत्रातील वक्त्यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाशिम आणि मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांच्या मार्फत वाशिम मीडिया चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. स्वागत संबोधन ब्रह्माकुमारी स्वातीादीदी, राजयोग शिक्षिका, वाशिम सेवाकेंद्र यांनी केले. विषय प्रास्ताविक ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी माध्यमांमध्ये येत असलेल्या नवीन प्रवाहांमुळे होत असलेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला. विषयावरील बीज भाषण प्रस्तुत करतांना डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव यांनी सायबर युगातील पत्रकारितेत मानवी संवेदना आणि वास्तवदर्शनावर आधारीत पत्रकारीतचे मूल्य जपण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन चर्चासत्राचे उदघाटन झाले.
आपल्या उद्घाटकीय संबोधनात श्री. माधवराव आंभारे, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी अध्यक्ष अ.भा. मराठी पत्रकार परीषद, मुंबई यांनी सायबर युगात वाचकांचा बातमीवरचा विश्वास दृढ राहण्यासाठी उपस्थितांना काही अनुभव कथन केलेत.
उपस्थित मान्यवरांचे प्रातिनिधीक स्वरुपात शुभेच्छा त्यात श्री. सुनील मिसर, ज्येष्ठ पत्रकार, जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र टाईम्स, वाशिम, यांनी निपक्षपणे पत्रकारिता करण्यासंदर्भात सूचित केले. श्री. नंदकिशोर वैद्य, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक भास्कर, वाशिम मुद्रीत माध्यमांचे महत्व अधोरेखित केले. श्री. राजेश राजोरे, संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा, पत्रकारितेचे वास्तव मांडतांना त्यांचे स्वअनुभव सांगितले. त्याग, तपस्या आणि समपर्णवृत्ती जपल्यास मुल्यनिष्ठ पत्रकारिता शक्य असल्याचेही राजोरे यांनी सांगितले. श्री. निलेश सोमाणी, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, वाशिम, यांनी राष्ट्राला दिश देण्याचे काम महाराष्ट्रातील पत्रकारितेने केल्याचे म्हटले, श्री. रविंद्र कुटे, दैनिक देशोन्नती यांनी व्यावसायिकता आणि प्रामाणिकता यांचे संतुलन राखण्याची जबाबदारी माध्यमांवर असल्याचे म्हटले. श्री. प्रल्हादाराव पौळकर, जिल्हा प्रतिनिधी, निर्मल विदर्भ यांनी पत्रकारांना मुक्याचा नायक बनण्याचे आवाहन केले. श्री. गजानन वाघ, श्री. इरफान भाई, श्री. मिलींद खडसे, श्री. राम धनगर दूरदर्शन प्रतिनिधी, वाशिम यांचीही समयोचित मनोगते व्यक्त केलीत.
राजयोगीनी ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदीजी, संचालिका, अकोला सेवाकेंद्र यांनी आशीर्वचन दिले. राजयोग अभ्यास बी.के. ज्योतीदीदी, राजयोगी शिक्षिका, रिसोड यांनी केला. आभार प्रदर्शन प्रा. रवी अंभोरे तर सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी किरण यांनी केले. मीडिया चर्चासत्रासाठी वाशिम जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर मीडिया क्षेत्रातील बहुसंख्य माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
***