logo

प्रजासत्ताक दिनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवीणार. महसूल अधिकारी व गोडावुन किपरची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी.

राहुरी तहसील येथे शासकीय गोदामात गोडाऊन कीपर म्हणून काम करत असणारे शिवाजी शिंदे यांची व पुरवठा अधिकारी यांच्या सर्व कामकाजाची तात्काळ चौकशी होऊन कार्यवाही करण्या बाबत चंद्रकांत अशोक जगधने यांनी महसूल प्रशासनास निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे कि, चंद्रकांत अशोक जगधने मु. पो. आरडगाव, ता. राहुरी, हे आवाज जनतेचा या न्यूज चैनलचे राहुरी प्रतिनिधी आहे. राहुरी येथील शासकीय अन्नधान्य गोदाममध्ये कार्यरत असणारे गोडवान कीप्पर शिवाजी शिंदे यांच्या अनेक तक्रारी मला जनतेतून प्राप्त झालेल्या आहे. या तक्रारी बाबत मी चौकशी केली असता मला त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे.


सदर कर्मचारी शिवाजी शिंदे यांची राहुरी येथून बदली झाल्याची देखील माहिती आम्हाला समजली आहे. असे असताना देखील हा कर्मचारी राहुरी येथे कार्यरत कसा? या बाबत सदर कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी. व अन्नधान्य पुरवठा विभागाची गाडी राहुरी येथे आली असता सदर धान्य मोजून गोदाममध्ये ठेवावे असा नियम आहे. असे असताना देखील सदर अन्नधान्याची गाडी आली असता सदर गाडी गोदामध्ये न उतरवता बेकायदेशीर रित्या सदर गाडीतील माल हा इतर गाडीत गाड्या क्रॉसिंग करून भरल्या जातात. व सदर गाड्या क्रॉसिंग केल्यामुळे धान्यचा गोण्यातील बरेसचे धान्य हे काढले जाते.
नियमानुसार सदर गाड्या गोडवानमध्ये उतरवून त्यांचे वजन करून त्या इतरत्र ठिकाणी वितरित केल्या पाहिजे. परंतु असे होताना मात्र दिसत नाही.(सदर गाड्या क्रॉसिंग लावले असतानाचे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे). म्हणून ३० जुलै २०२५ ला मी व माझे पत्रकार मित्र दीपक साळवे सदर शासकीय गोदाम परिसरात गेलो असता गोडाऊन कीपर शिवाजी शिंदे यांनी आम्हाला दमबाजी केली.


आम्ही क्रॉसिंग ने भरत असलेल्या गाड्यांना विरोध केला असता सदर गोडवान कर्मचारी शिवाजी शिंदे यांनी आम्हाला दमबाजी केली व असे म्हटले की तुम्ही या परिसरामध्ये का आलात? तुम्हाला या परिसरामध्ये येण्याचा काय अधिकार?मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? इथली शूटिंग तुम्ही अजिबात घ्यायची नाही? माझ्या गळ्यातील निळा गमच्या पाहून असे देखील बोलले की निळा गमछा घालून तुम्ही माझ्या गोदामकडे फिरकायचे नाही? तुम्ही कोण आहात आणि तुमची काय लायकी आहे ते मला माहित आहे. अशा शब्दात आम्हाला वागणूक दिली.

जर तुम्ही या परिसरात आलात व माझ्या कामाची चौकशी केली, मला प्रश्न विचारले तर मी तुमच्यावर ३५३ म्हणजेच सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर या कलमानुसार मी गुन्हा दाखल करील, अशी धमकी दिली. आणि इथले सर्व शासकीय अधिकारी माझ्या हातातले बाहुले आहेत. मी कुणालाही भीत नाही, अशा शब्दात सदर कर्मचाऱ्यांनी आम्हास आरेरावी केली व माझा खूप लोकांमध्ये अपमान केला.

तरी त्यामुळे मला खूप मानसिक त्रास देखील झालेला आहे. तरी माझी आपणास या अर्जाद्वारे नम्र विनंती आहे की, सदर गोडवान किप्पर कर्मचारी शिवाजी शिंदे याची व त्याच्या कामकाजाची तात्काळ चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. सदर कर्मचाऱ्याला पाठीशी घालणारे राहुरी तालुका पुरवठा नायब तहसील सुदर्शन केदार व पुरवठा आधिकारी ज्योती सकभोर यांची व त्यांच्या कामकाजाची तात्काळ पूर्णपणे खातेनिहाय चौकशी व्हावी व या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

असे न झाल्यास मी येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२५ रोजी मी आपल्या दलनासमोर मी या स्वातंत्र्य देशाचा स्वातंत्र नागरिक या नात्याने आपल्या विरोधात मी स्वतःच माझ्याच तोंडाला काळे फासवून काळे झेंडे दाखऊन सर्व अधिकाऱ्यांचा व प्रशासनाचा जनते समोर तीव्र जाहीर निषेध नोंदविल याची आपण सखोल नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

15
378 views