logo

प्राथमिक माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केवड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केवड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी*
केवड आश्रमशाळा येथे संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील विनायक लोखंडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
केवड आश्रमशाळा येथे आज या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक लोखंडे यांनी मानले
जाधव सरांनी प्रास्ताविकात सांगितले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या गरीब कुटुंबात जन्म झाला परंतु या सर्व गोष्टी मात करून महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक लोककवी लेखक विचारवंत म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केली ते एक विपुल साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात औपचारिक शिक्षण नसले तरी त्यांनी 32 कादंबरी 13 लघुकथा संग्रह शेकडो गाणी पोवाडे पथनाट्य यांसारख्या विपुल साहित्यनिर्मितीद्वारे समाजातील वंचित व शोषित घटकांचा आवाज बनले आहे असे त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले
प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा केली त्यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले स्वदेशी चळवळ व बहिष्कार चळवळीत सहभाग नोंदवला त्यांचे राष्ट्रवादी विचार त्यांच्या कार्याची तरुणांना प्रेरणा मिळाली त्यांनी इंग्रज शासनाविरोद्ध बंड पुकारले इंग्रजांनी यासाठी त्यांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी केली असे त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

32
6323 views