
निवडणूक आयोगाने केले बी एल ओ चे मानधन दुपट
Aima Media news chandrapur
वृत्तसेवा :- लोकशाही प्रक्रियेत निवडणुकीला महत्व असते भारतासारख्या अखंडप्राय देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात विधानसभा पासून तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येतात या प्रकियेत काम करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्त केले जातात मात्र त्यांना नाममात्र मानधन मिळत होते मात्र भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे. अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीसाठी भक्कम आधार असून, निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्यासाठी आणि तिच्या पुनरावलोकनासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याकरिता हे पाऊल उचलले आहे. या नवीन तरतुदीनुसार बीएलओचे २०१५ चे पासूनचे मानधन ६ हजारवरून १२ हजार रुपये, तर मतदार यादी पुनरावलोकना साठी बीएलओ प्रोत्साहन रक्कम एक हजार रुपयांवरून २ हजार रुपये करण्यात आली आहे. बीएलओ पर्यवेक्षक यांना १२ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये अशी वाढ करण्यात आली. एईआरओ यांना प्रथमच २५,००० आणि ईआरओ यांनाही प्रथमच रु. ३०,००० मानधन देण्यात येईल.