logo

सोलापूर जिल्ह्यातील केवड आश्रमशाळेतील 400 विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा केवड व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य निवासी कनिष्ठ महाविद्यालय केवड ता. माढा जि. या प्रशालेने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विद्यार्थ्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते निवडणुकीचा प्रचार प्रसार कार्यपद्धती तसे प्रशिक्षण राजकीय धडे देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हा आश्रम शाळेत राबवण्यात आला
या आश्रम शाळेत भटक्या विमुक्त जाती जमाती अनुसूचित जाती जमाती तसेच परिसरातील इतर विद्यार्थी ही आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत. सदर निवडणूक प्रक्रियेतून एक मुख्यमंत्री निवडून देऊन मंत्रिमंडळाची स्थापना केली. जवळपास या प्रशालेत 400 च्या आसपास विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला संस्थेचे संस्थापक सचिव महारूद्र मामा चव्हाण यांच्या संकल्पनेतून शिक्षक ही निवडणूक प्रक्रिया गेल्या १० वर्षापासून पार पाडत आहेत. निवडणूक आयोग प्रमुख म्हणून सयाजी चौगुले व संतोष भुसारे यांनी काम पाहिले
यावेळी अर्ज भरणे अर्ज छाननी अर्ज माघारी घेणे चिन्ह वाटप करणे प्रचार कार्यक्रम आचारसंहिता मतदान मतमोजणी व निवडून आलेल्या सर्व मंत्र्यांचा शपथविधी असा निवडणूक कार्यक्रम हा या प्रशालेत घोषित केला . या मतदानासाठी चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला प्रत्येक उमेदवारांनी आपल्या चिन्हाचा प्रशालेमध्ये योग्य पद्धतीने प्रचार केला व आपण प्रशालेसाठी काय करू शकतो विद्यार्थ्यांसाठी कोणत्या पद्धतीने मदतीस येऊ शकतो असे त्यांनी प्रत्येकाला पटवून दिले मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी नंतर निवडून आलेल्या उमेदवारांनी फटाके फोडून व गुलालाची उधळून करीत प्रशालेत जल्लोष साजरा केला विजय सात सदस्य पैकी एक मुख्यमंत्री म्हणून निवडला गेला व बाकीच्यांना प्रशालेमध्ये उपयुक्त असे मंत्रीपद देण्यात आले यावेळी प्रशालेतील कल्पेश सलगर यांनी 210 मते घेऊन मुख्यमंत्री म्हणून सर्वानुमते निवड केली सात जणांचे मंत्रिमंडळ स्थापन करून शपथविधी व सत्कार सोहळा पार पडला तसेच जवळपास या प्रशालेत 100 च्या आसपास मुली या वस्तीगृहात असून मुलींचेही मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. मुलींच्या उपयुक्ततेसाठी शिस्तीसाठी मुलींमधूनच निवडले गेले जवळपास 100 मुलींनी मतदानाचा अधिकार बजावला व त्यातून मुख्यमंत्री व इतर सात मंत्री हे निवडले गेले ही मुलींची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरिता चव्हाण मोनिका चव्हाण ज्योती लटके साधना घोंगडे मनीषा खडतरे पल्लवी गाढवे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली
यावेळी संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील विनायक लोखंडे प्रकाश जाधव कमलाकर साखळे काकडे डी. एस. युवराज जगदाळे लक्ष्मण कदम नितीन सलगर कृष्णा घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकाचे ज्ञान न देता इतरही उपक्रम या प्रशालेमध्ये राबविले जातात निवडणुकीची माहिती व अनुभव मुलांना मिळावा म्हणून हा उपक्रम राबवल्याचे संस्थेच्या वतीने सांगितले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते
*असे निवडले मुलांची मंत्रिमंडळ*
*1. कल्पेश गणेश सलगर*
(मुख्यमंत्री/अर्थमंत्री/क्रीडामंत्री ।
*2. राम अर्जुन मिसाळ*
{ अन्नपुरवठा व जलसंधारण मंत्री}
*3. विजय नाथा सावंत*
(स्वच्छता मंत्री व वृक्षसंवर्धन
*4. महेश दत्तात्रय गंगावणे*
{ आरोग्यमंत्री}
*5. पृथ्वीराज भिवाजी आहेर*
( शिक्षणमंत्री)
*6. राजू संभाजी चव्हाण*
(शिस्तमंत्री)
*7. लखन अर्जुन मिसाळ*
(सांस्कृतिक मंत्री (ऊर्जामंत्री/हारवले सापडले विभागः
*8. शंभू राजाभाऊ मुंडे*
( विरोधी पक्ष नेता )

*असे निवडले मुलींचे मंत्रिमंडळ*
*1)साक्षी सावंत*
(मुख्यमंत्री)
*2)अंजली भडंगे*
(स्वच्छता मंत्री)
*3)सोनल नवल*
(शिस्तमंत्री)
*4)प्रिया सावंत*
(अन्नपुरवठा व पाणीपुरवठा मंत्री)
*5)मयुरी काळे*
(शिक्षणमंत्री)
*6)सानिया क्षीरसागर* (आरोग्यमंत्री व विरोधी पक्ष नेता)

6
1118 views