रताळीच्या रस्त्यावर – जिवंत विद्युत तारेचा थरार, पण वीज विभाग ‘डोळे मिटून झोपलेला!’
_दि.04/08/2025 रोजी पहाटे ५.०० वा. साखरखेर्डा ते अंत्री झाल्टे मार्गावर राताळी येथील डीपीची जिवंत विद्युत प्रवाह वाहत असलेली तार तुटून रस्त्यावर पडलेली आहे._
_स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या संबंधित यंत्रणेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला._
_मात्र एकाही व्यक्तीचा मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही._
_अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी ते अधिकारी यांनी सदैव जागरुक असणे गरजेचे असतांनाही मोबाईल वर संपर्क होऊ शकत नाही, ही निषेधार्ह व खेदाची बाब आहे._
_जीवीत्वास धोकादायक असलेल्या प्रकरणी तातडीने कारवाईची गरज आहे._