शिवणे,उत्तमनगर, वारजे परिसरात लाईटचा नागरिकांच्या बरोबर लपंडाव,
शिवणे,उत्तमनगर, वारजे परिसरात लाईटचा नागरिकांच्या बरोबर व उद्योगिक क्षेत्रा बरोबर रोजच लपंडाव चालू आहे. ऐन पावसाळ्यात दिवसातून अनेकवेळा लाईट जाते, उद्योगिक क्षेत्र त्यामुळे विस्कळीत झाले आहे.दिवसाला लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे अश्या प्रतिक्रिया उद्योग विश्वातून उमटू लागल्या आहेत. नागरिक वस्तीत ही हीच समस्या आहे. लाईट येणे जाणे चालू असल्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणे यांना धोका पोहचण्याचा सभव आहे. जर यामुळे नुकसाम झाले तर याची जबाबदारी MSEB प्रशासन घेणार हा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा.