logo

आ. सौ .श्वेता ताई महाले यांच्या हस्ते.मौजे सवणा येथे वर्गखोलीचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आनंदी क्षण:

मन्सूर शहा chikhli.buldana.aimamedia:--मौजे सवणा येथे वर्गखोलीचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आनंदी क्षण:
शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे असलेल्या मौजे सवणा येथील जिल्हा परिषद मराठी, उच्च प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. नव्या पिढीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे हे क्षण ग्रामस्थांनीही अनुभवले.
शिष्यवृत्ती परीक्षेत विदर्भातून सर्वप्रथम आलेल्या कु. किरण भुतेकर व दुसरी आलेल्या कु. कोमल शिंदे या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार, तसेच इतर विद्यार्थ्यांचे कौतुक या वेळी केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या वेळी ग्रामपंचायत भवनाचे 25 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजनही केले.
या शाळेला आणखी दोन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत. या गावातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 450 असून वर्ग मात्र पहिली ते 8वीपर्यंतच आहेत. येथे दहावीपर्यंत शाळा व त्यासाठी नवीन इमारत पाहिजे अशी मागणी या वेळी गावकऱ्यांनी केली. गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि शासनाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणू, असे आश्वासनही दिले. मी आमदार झाल्यानंतर या गावात विविध विकासकामे केली आहेत. मागील निवडणुकीत मौजे सवणा येथील गावकऱ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले होते आणि या निवडणुकीतही ग्रामस्थांनी भक्कम साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार या वेळी व्यक्त केले.
या आनंदसोहळ्यास गटविकास अधिकारी सर्वश्री समाधान वाघ, गटशिक्षणाधिकारी प्रकाश सपकाळ, भाजपा मंडळ अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे, आर. आर. पाटील सर, प्रवीण वायाळ सर, शाळा समिती अध्यक्ष सुधाकर भुतेकर, डिगांबर जाधव, पुरुषोत्तम घडे, अनुराग भुतेकर, सरपंच रवींद्र शिरसाठ, उपसरपंच मालताबाई एखंडे, राजू भुतेकर सर, पोलीस पाटील अंनथा साळोख, शाळा व्यवस्थापन समिती‌सह ग्रामस्थ, महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

14
8948 views