logo

अनेक वर्षापासून पात्र असून प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित लाभार्थ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

वर्धा (प्रतिनिधी)
देवळी नगरपरिषद कार्यालयात– प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) अंतर्गत लाभ मिळावा यासाठी आज मीरननाथ
मंदिर मागील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी सौ. आकोडे मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. 30 -40 वर्षापासून सदर जागेवर राहत असून आम्हाला अद्यापही नगरपरिषद ने किंवा शासनाने पट्टे उपलब्ध करून दिले नाहीत. आमच्याकडून टॅक्स मात्र नियमित वसूल केला जातो. आम्हाला रस्ते रोड नाल्या लाईट या नागरिक सुविधा मिळतात स्वच्छ भारत अंतर्गत संडासच्या स्कीम सुद्धा मिळाल्या पण पट्टा नाही हे कारण देत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नाकारण्यात येतो जेव्हा केव्हा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरला जातो तेव्हा तुम्ही वनविभागात आहात किंवा नझूल जागेवर आहात असे सांगून आमचा लाभ नाकारला जातो हे सत्र 2010 -11 पासून आज तागायत सुरू आहे. 2010 -11 मध्ये काही नागरिकांना घरकुल मिळाले पण ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. काही घरांवर स्लॅब आहे काही घरांवर नाही काही घरांचे प्लास्टर झाले आहेत काही घरांचे नाही संडास बाथरूमची व्यवस्था नाही असा जन आक्रोश यावेळी करण्यात आला.
यावेळी 1 ऑगस्ट 2025 रोजी शासनाच्या महसूल विभागाने काढलेल्या नव्या शासन निर्णयाची (GR) प्रत देखील सादर करण्यात आली. या GR नुसार 2.0 अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना पुढील टप्प्यातील मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे.
निवेदनात नागरिकांनी नमूद केले की, अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. 2017 च्या लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा लाभ मिळालेला नाही 2.0 अंतर्गत घरकुलसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही मंजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या GR चा संदर्भ घेऊन नगरपरिषदेकडून तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
मुख्याधिकारी आकोडे मॅडम यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी जब्बार तव्वर, रविंद्र पारीसे, शंकर केवदे, गणेश शेंडे, किरण बोंडने, निलेश महाजन, विलास बोरकर, संतोष शिवरकर, दिनेश कावरे, अक्षय सडमाके, संदीप अगडे संबंधित लाभार्थी व काही स्थानिक नागरिक उपस्थित होते.

67
5052 views