logo

७०० ते ८०० विद्यार्थी/विद्यार्थिनींनी घेतला प्राचीन नाण्यांच्या प्रदर्शनीचा आस्वाद*

*७०० ते ८०० विद्यार्थी/विद्यार्थिनींनी घेतला प्राचीन नाण्यांच्या प्रदर्शनीचा आस्वाद*

सादिक शाह aima Media बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष

*चिखली :* ५ ऑगस्ट २०२५ रोजी राजाभाऊ बोंद्रे उर्दू/मराठी नगरपरिषद शाळा चिखली येथे भव्य दिव्य नाण्यांचे प्रदर्शने पार पडले.
अडीच हजार वर्षांपासून देशाची अर्थव्यवस्था कशी होती त्यावेळची अखंड भारताची संस्कृती काय होती याबद्दल सर्वच माहिती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली. पंचमार्क मगध महाजनपद, चंद्रगुप्तमौर्य नाणी, समुद्रगुप्त नाणी, कुशाण कनिष्कांची नाणी, सातकर्णी सातवाहन नाणी, रुद्रदमन क्षत्रप नाणी, शेरशाह सूरी नाणी, अकबर, शाहजहान मुघल नाणी, ०६ जून १६७४ शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यानची छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी, राजाराम महाराज यांची जिंजी येथील सोन्याची फणम नाणी, थोरले शाहू महाराज यांची नाणी, पेशवेकालीन नाणी, टिपू सुलतान यांची नाणी, अहिल्याबाई होळकर यांची नाणी, ब्रिटिश सरकारची नाणी आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतरील नाणी, ब्रिटिशकालीन मेडल्स, पोस्ट तिकिटे, माप, दुर्बीण अशा सर्वच ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा या ठिकाणी करण्यात आला.
वेळोवेळी विद्यार्थी/विद्यार्थिनींना इतिहासातील प्रश्न विचारून त्यांना बक्षीस म्हणून नाणी

89
4482 views