logo

देवा ग्रुप फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री

कल्याण तालुक्यातील देवा ग्रुप फाउंडेशन (भारत कमिटी) अंतर्गत अध्यक्ष सुजित ढोले उर्फ पप्या भाऊ आणि सचिव डॉ. तानाजी भाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून खडवली विभागातील जिल्हा परिषद शाळा वालकस व बेहरे येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे संच व खाऊचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना मिळालेली ही मदत उपयुक्त ठरणार असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.

✨ उपस्थित मान्यवरांचे शब्दांतून प्रेरणा
कार्यक्रमास देवा ग्रुप फाउंडेशन भारत कमिटीचे सचिव डॉ. तानाजी मोरे, युवा अध्यक्ष हेमंत मोरे, कोकण प्रदेशाध्यक्ष अनिकेत मेस्त्री, तसेच गिता गजानन कडव (सरपंच), जगन कडव (उपसरपंच) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याशिवाय शाळेतील शिक्षक वर्गातून अनिल सांगळे सर, पी.आर. पाटील सर, शशिकांत बौद्र सर, संभाजी हुले सर यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमीही उपस्थित होते.

🙌 कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य –
गजानन कडव, महेश शेलार, आशिष कडव, योगिता शेलार, मनोहर गोरले, विजय लोणे, देवा सोनावणे, नागेश कडव, काका कडव, गौतम हरणे, सचिन कडव, चेतन ठाकरे, दीपक गोरने – यांनी विशेष मेहनत घेतली.

105
5030 views